देशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिलांचा पक्षप्रवेश.

लातूर | लातूर जिल्ह्यात शिवसेनेचे राजकीय गणित आता अधिक मजबूत होताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक महिलांनी नुकताच ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्या — श्रीमती जयश्रीताई भुतेकर, सुरेखा गाडेकर, प्रगती ताई डोळसे, दिशाताई प्रतापपुरकर, भाग्यश्री भुतेकर आणि लता पाटील यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. ठाण्यातील स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सर्वांनी भगवा स्वीकारला.

या प्रसंगी शिवसेना सचिव संजयजी मोरे, रामदादा रेपाळे, पांडुरंग पाटील, प्रशांतजी पलांडे, अ‍ॅड. मनोज क्षीरसागर, युवा सेनेचे सचिव राहुल लोंढे, निरीक्षक धीरज देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या महिलांच्या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “हे केवळ प्रारंभ आहे. आगामी काळात लातूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात महिला भगव्या विचारांकडे वळतील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button