क्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

पोलीस उपनिरीक्षकाकडून २५ हजारांची लाच मागणी; गुन्हा दाखल होण्याआधीच फरार.

लातूर –28/05/2025
MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांतसिंह रघुनाथसिंह रजपूत यांनी एका तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर युनिटकडून कारवाई सुरू आहे.

तक्रारदाराच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी, उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मदतीचा रिपोर्ट देण्यासाठी व हजेरी कमी करण्यासाठी उपनिरीक्षक रजपूत यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही तक्रार १५ मे २०२५ रोजी लाचलुचपत विभागाकडे दाखल करण्यात आली.

तक्रारीची पडताळणी १५ मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली. यावेळी आरोपीने लाच स्वीकारण्याची तयारी

दर्शवली होती. त्यानंतर १५, १९, २६ आणि २८ मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली. मात्र, तक्रारदाराला संशय आल्याचे लक्षात येताच आरोपीने लाच स्वीकारण्याचे टाळले.

आरोपी पोलीस उपनिरीक्षक गुन्हा दाखल होण्यापूर्वीच रुग्णनिवेदन दाखवून फरार झाले आहेत. अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांचे लातूरमधील घर तपासले जात असून मूळगावी हिंगोली येथेही घरझडती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५०/२०२५ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाई पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांना लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९२२६२०१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button