क्राइममहाराष्ट्र

तब्बल 16 लाखांच्या सोयाबीन चोरीचा पर्दाफाश – औसा पोलिसांची मोठी कारवाई.

Bedhadak awaj -लातूर जिल्ह्यातील औसा येथे शेतकऱ्यांच्या सोयाबीन चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला होता. एमआयडीसी परिसरातील एका गोडाऊनमधून तब्बल 100 क्विंटल म्हणजेच सुमारे 16 लाख रुपये किमतीचे सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 24 तासांत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांची तगडी कामगिरी

औसा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली आणि अखेर चोरांचा छडा लावण्यात यश मिळवले.

असे लावला छडा

चोरट्यांनी तब्बल 200 कट्टे सोयाबीन एका आयशर टेम्पो आणि बोलेरो जीपमध्ये भरून पळवले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरांचा माग काढला आणि चोरी गेलेला माल जप्त केला.

अटक केलेले आरोपी

या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे –
1️⃣ अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. वसवाडी, पाखरसांगवी, लातूर)
2️⃣ अभय अवधूत भोळे (वय 22, रा. वसवाडी, पाखरसांगवी, लातूर)
3️⃣ मनोज राजू खताळ (वय 22, रा. माऊली नगर, पाखरसांगवी, लातूर)
4️⃣ हनुमंत भैरवनाथ मुंडे (वय 39, रा. टाकळी शिराढोण, धाराशिव)

शेतकऱ्यांना दिलासा

चोरीस गेलेल्या संपूर्ण सोयाबीनसह गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चोरी गेलेले सोयाबीन शेतकऱ्यांना परत दिले जाणार आहे. पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी कारवाई करून अवघ्या 24 तासांत चोरांचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांचे कौतुक

या यशस्वी कारवाईसाठी औसा पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार कांबळे, पोलीस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद, तुमकुटे, चामे, पाटील, भंडे, मगर यांनी मेहनत घेतली.

या जलद आणि प्रभावी तपासामुळे औसा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button