आरोग्यक्राइमदेशप्रशासनमहाराष्ट्रराजकारण

बनावट खत घोटाळा उघड “छावा”ची कारवाई ठरली निर्णायक.

निलंगा, ता. ३o मे bedhadak awaj
निलंगा तालुक्यातील निटूर येथे आज सकाळी काळ्या बाजारात बोगस खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘छावा’ संघटनेने उचललेले तात्काळ पाऊल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई यामुळे तब्बल १२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरहून सम्राट ऍग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं खत घेऊन आलेला ट्रक आणि टेम्पो आज सकाळी निटूर येथे एका खाजगी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना विना पावती अल्प दरात खत विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब ‘छावा’ संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या लक्षात येताच त्यांनी ट्रक आणि टेम्पो थेट निटूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

या

कारवाईत कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे पंचनामा केला. ट्रक (क्रमांक MH-24 8111) आणि आयशियार टेम्पो (क्रमांक MH-04 8231) मधून खताची विक्री होत होती. ट्रक व टेम्पोमधील खताची किंमत सुमारे २ लाख ७८ हजार रुपये असून, ट्रक व टेम्पोची अंदाजे किंमत अनुक्रमे ६ लाख व ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. एकूण जप्त ऐवजाची रक्कम सुमारे ११ लाख ७८ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणात मुख्य एजंट सज्जन सूर्यकांत गावडे (रा. सोलापूर), ट्रक चालक मोहसीन शेख (२६, रा. डोगरज, ता. चाकूर) आणि टेम्पो चालक विशाल हनुमंत आरीकर (रा. ता. शिरूर अनंतपाळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४, ५, ७, ८, १९, खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कलम ३(२) व ३१८, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे करत आहेत.

निलंगा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून सम्राट ऍग्रो कंपनीचे बोगस खत बिनधास्तपणे विकले जात असल्याचे आरोप ‘छावा’ संघटनेकडून करण्यात आले आहेत. यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांचीही संलग्नता असल्याची शंका व्यक्त होत असून, या साखळीतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे.

तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, खत विकत घेताना शहानिशा करूनच खरेदी करावी आणि कुठेही संशयास्पद विक्री दिसल्यास तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी. तसेच, सर्व खत विक्रेत्यांनी दुकानाबाहेर स्टॉक व विक्रीची माहिती स्पष्टपणे लावावी, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button