प्रशासनमहाराष्ट्रराजकारण

लातूर जिल्हा भाजप खेळतेय चिडीचा डाव!! बीजेपी विरोधात बोलाल तर खबरदार तुमचा हि फॅमिलीतील व्यक्तीचं चारित्र्य होणार हाणणं!!

बेधडक आवाज मुख्यसंपादक – (शरद पवार)
महाराष्ट्राची परिस्थिती पाहता वास्को-द-गामा व्यापारी म्हणून आला आणि राज्यकर्ता बनला तसंच काहीसं उदाहरण या महाराष्ट्राच्या राज्यकारभाराच चालू आहे. फोडा -फोडी जोडा आणि राज्यकारभार करा ही इंग्रजाची कटू नीयती आज भारतीय जनता पार्टी अमलात आणताना पाहावयास मिळत आहे.कारण आज पर्यंत महाराष्ट्राच्या राज्यकारभारामध्ये सक्रिय असलेले अनेक पक्ष अनेक नेते अनेक संघटना यांचा काडीमोड करून फक्त आणि फक्त आम्हीच राज्यकारभार करू शकतो किंवा आम्हाला नाही तर कुणालाच नाही.हे धोरण भारतीय जनता पार्टीने अवलंबलेले दिसत आहे. या उपरोक्त कोणी हिंमत करून बोलण्यासाठी पुढे आला किंवा विरोध

करण्यासाठी आपल्या नैतिक अधिकाराच्या जोरावर मतदार म्हणून पत्रकार म्हणून समाजसेवक म्हणून एखाद्या संघटनेचा पुढारी म्हणून किंवा विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर कोणी विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केलाच तर त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये झालेल्या मान अपमान सन्मान कौटुंबिक वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये आसलेला दुजाभाव यांचा बोलबाला सामाजात करण्याची धमकी वजा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व कार्यकर्त्याच्या वतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कामास लावलेल्या काही महाभागांकडून सोशल

मीडियाच्या माध्यमातून अवैद्य फेसबुक ट्विटर व्हाट्सअप असे खाते खोलून त्याद्वारे भारतीय जनता पार्टीला विरोध करणाऱ्या व्यक्तीला दम दिला जात आहे . अशी चर्चा सर्वच स्तरातून ऐकावयास पहावयास मिळत आहे. म्हणजे राजकीय पक्षातून कोणी नेता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे ईडी बिडी, सीडी क्राईम ब्रँच सीबीआय अशा महत्त्वपूर्ण खात्यांच्या शासकीय पगारातून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या भारतीयांनाच लावून दिले जात आहे.कुणी समाजसेवक पत्रकार विरोधात बोलण्याची हिंमत दाखवला तर त्याला पण साम-दाम-दंड अशा तिन्ही प्रकारे धमकावण्याचा प्रकार सध्याला चालू आहे. यामधून असं जाणवत आहे की

महाराष्ट्राच्या धरतीवर मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाचा अतिशय भया व्ह व परिणाम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर झालेला दिसतोय यामध्ये प्रमुख परिणाम झाला तो मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांना सळो कि पळो करून सोडलं ते कोणालाही मॅनेज झाले नाहीत आणि त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 26 जागेवरून 8 जागेवर यावं लागलं यामुळे हा मराठा आरक्षणाचा झालेला वार भारतीय जनता पार्टीच्या जिव्हारी लागला आहे.भारतीय

जनता पार्टीच्या या अतिशय काय म्हणता येईल निवडणुकीच्या निकालामध्ये पराभवाची निर्माण झालेली भीती आणि त्या भीतीमधुन हे असले गलिच्छ कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवले जात आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेची झालेली पडझड लक्षात घेऊन हा चालवलेला कार्यक्रम थांबवला तरच त्यांना या विधानसभेमध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त होईल असा बोलबाला मतदार व लातूरकर ची जनता करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर अगदी 100% इंग्रजाची कठुनिती भारतीय जनता पार्टी सध्या अमलात आणत आहे तेव्हा यांच स्वप्न असं तर नाही ना इंग्रजांनी 150 वर्ष भारत देशाला गुलाम करून ठेवलं,

तसं हे पण संपूर्ण भारताला गुलाम बनवण्याच्या मनस्थितीत तर नाहीत ना, कारण सरकारी अधिकारी,राजकीय नेता,पत्रकार,समाजसेवक संघटक मतदार कोणालाही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलण्याची हिंमत राहू नये किंवा कोणीही आपल्या राज्यकारभाराचा चालवलेला काळा कारभार जगासमोर आणू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या होत आहेत आणि हे समाजात चालू असलेलं विदारक राजकीय सामाजिक आणि लोकशाहीच्या अस्तित्वाच भयावह चित्र आहे.

सर्व जागरूक मतदार बंधू भगिनी आणि लातूरकर विचार करा पक्का लोकशाहीला नाही लागणार धक्का असाच नेता आपण निवडून द्यायचा आणि जो लोकशाहीच्या आधीन त्याच्याच चिन्हावर मारायचा आहे शिक्का,
कोणीही नाही,आपला सग-सोयरा त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला लोकशाहीचा कासरा ओढून धरा आपली लोकशाही आपली शक्ती आपला अधिकार आणि आपलं भारतीयत्व जिवंत ठेवायचं असेल तर या चालू असलेल्या सर्व गलिच्छ राज्यकारभाराचा नायनाट झालाच पाहिजे आणि त्या हिशोबानेच आपण या वेळेला मतदान कराल हीच यात काही शंकाच नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button