खोपेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेच्या ११ घरकुलांचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

बेधडक आवाज लातूर, ५ मार्च २०२५ – लातूर तालुक्यातील मौजे खोपेगाव येथे पंतप्रधान आवास योजना (टप्पा २.०) अंतर्गत मंजूर ५२ घरकुलांपैकी ११ घरकुलांचा आज गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलांच्या उभारणीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास खोपेगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. सरस्वती रमेश मोरे, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर शिरुरे, अभियंता युसुफ पठाण, सहकारी मुद्रणालयाचे चेअरमन लक्ष्मण मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गावकरी आणि घरकुल लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन लाभार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार ग्रामरोजगार सेवक अमोल घायाळ यांनी मानले.
खोपेगावमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होत आहे. या योजनेंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हप्त्यांचे वितरण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.